नाम रोजगार

प्रयत्न आमचे , कर्तृत्व तुमचे

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तरुण युवक -युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
नाम फाउंडेशन ही संस्था गेल्या ५ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम राबवून शेतकरी कष्टकरी गरीब गरजू कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे .
आता युवक -युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे यासाठी आपल्याला विनंती आहे कि गरजू युवक -युवतींनी खाली दिलेल्या सूचना व अटी काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरून द्यावा.

विस्तृत तपशील (सूचना )

१. नोकरीसाठी तुम्ही दिलेली शैक्षणिक माहिती विविध कंपन्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयंत्न केला जाईल.
२.कंपन्यांमधील रिक्त जागा, कामाचे स्वरूप व त्यासाठी आवशयक शैक्षणिक पात्रता तपासून किंवा नोकरी देण्याचा अंतिम अधिकार संबंधित कंपनीचा असेल.
३. कंपन्या त्यांच्या आवश्यकतेनुसार संधी देतील.
४ . नोकरी देण्याचा,नाकारण्याचा, नोकरी दिल्यानंतर कामावरून कमी करण्याचा असे सर्व अधिकार संबंधित कंपनीचा असेल.
५. शैक्षणिक पात्रतेचा उलेख करताना आपण पदविका/ पदवी / पदव्यूत्तर याची विस्तृत माहिती लिहावी..
६. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी १०वी पास आणि वय १८ पूर्ण असावे .
७. या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हि सेवा पूर्णतः मोफत असेल.

( APPLY NOW / नाव नोंदवा )